Mahatet – Previous Year Question Paper 2021 free

Mahatet – Previous Year Question Paper विषय : परिसर अभ्यास 2021

इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकासाठी


प्रश्नपत्रिका
1)’मैदान’ या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता?
(1) छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग
(2) छत्तीसगड राज्याचा मध्यभाग आणि ओडिशा राज्याचा पश्चिम भाग
(3) पूर्वेचे पठार
(4) कर्नाटकचे पठार
2)’सखोल शेती’ या शेती प्रकाराशी संबंधित बाबी कोणत्या?
अ) एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रात घेतले जाणारे पीक
ब) मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर
क) मर्यादित यांत्रिकीकरण
(1) फक्त ‘अ’ आणि ‘ब’
(2) फक्त ‘ब’ आणि ‘क’
(3) फक्त ‘अ’ आणि ‘क’
(4) तिन्ही ‘अ’ ‘ब’ आणि ‘क’
3)गुजरातच्या सीमेशी लागून महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता?
(1) नंदुरबार-धुळे
(2) जळगाव-नाशिक
(3) ठाणे-पालघर
(4) ठाणे-मुंबई
4)’मासे’ यांच्याशी विसंगत बाब कोणती?
(1) काही मासे दीर्घायू असतात
(2) काही मासे अल्पायुषी असतात
(3) हृदय तीन कप्प्यांनी बनलेले असते
(4) शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार
5)संपर्कजन्य रोगांचा गट कोणता?
(1) अॅनिमिया, स्कव्हीं, गजकर्ण
(2) नायटा, इसब, युरेमिया
(3) खरूज, नायटा, गलगंड
(4) खरूज, इसब, गजकर्ण
6)मेलेल्या जनावरांच्या हाडांपासून ‘बोनमील’ या नावाने प्रचलित काय आहे?
(1) खत
(2) कीटकनाशके
(3) औषध
(4) –
7)मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक पोषकद्रव्ये कोणापासून मिळतात?
(1) पिष्टमय पदार्थ
(2) मेद
(3) जीवनसत्त्वे
(4) प्रथिने
8)जखमेच्या जागी रक्तस्त्राव गोठविण्याचे कार्य कोण करते?
(1) रक्तकेशिका
(2) रक्तबिंबीका
(3) रक्तलसिका
(4) रक्तग्रासिका
9)’आकाश निळ्या रंगाचे दिसते’ याला कारणीभूत घटक कोणते?
अ) वातावरण
ब) प्रकाशाचे विकिरण
(1) फक्त ‘अ’
(2) फक्त ‘ब’
(3) दोन्ही ‘अ’ आणि ‘ब’
(4) ‘अ’ आणि ‘ब’ दोन्ही नाही
10)सर्वसाधारणपणे धातू नसतात –
(1) तन्य
(2) वर्धनीय
(3) ठिसूळ
(4) सुवाहक
कारण-परिणाम :
अ) पाणी हे संयुग आहे
ब) पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सीजन यांच्या गुणधर्मांपेक्षा भिन्न आहेत
(1) फक्त ‘अ’ योग्य
(2) फक्त ‘ब’ योग्य
(3) दोन्ही ‘अ’ आणि ‘ब’ योग्य
(4) ‘अ’ आणि ‘ब’ दोन्ही अयोग्य
परिसंस्थेतील ‘विघटक’ अन्नसाखळीत कोणती क्रिया करतात?
(1) सात्मीकरण
(2) संक्रमण
(3) उत्सर्जन
(4) रसाकर्षण
भारताचा प्राचीन इतिहास कालखंड –
(1) ई.स.पू. 8 वे शतक ते ई.स. 10 वे शतक
(2) अश्मयुगीन काळ ते ई.स. 8 वे शतक
(3) अश्मयुगीन काळ ते ई.स. 10 वे शतक
(4) ई.स.पू. 8 वे शतक ते ई.स. 8 वे शतक
योग्य विधाने कोणती?
अ) हडप्पा संस्कृती = सिंधू संस्कृती
ब) हडप्पा व मोहेनजोदडो अवशेषांमध्ये समान वैशिष्ट्ये
क) हडप्पा व मोहेनजोदडो आज पाकिस्तानात
(1) फक्त ‘अ’ आणि ‘ब’
(2) फक्त ‘ब’ आणि ‘क’
(3) फक्त ‘क’ आणि ‘अ’
(4) तिन्ही ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’
‘बुद्धिमान मानव’ –
(1) होमो हॅबिलिस
(2) होमो इरेक्टस
(3) निअँडरथल मॅन
(4) क्रोमॅनॉन मॅन
शिवकाळात स्वराज्याचा भाग नसलेला प्रदेश कोणता?
(1) बेळगाव
(2) कारवार-धारवाड
(3) वेल्लोर
(4) म्हैसूर-मदुराई
‘छत्रपती शिवाजी महाराज सहकाऱ्यांना उद्देशून बोलतात’ असा प्रसंग कोणाच्या काव्यात?
(1) महात्मा फुले
(2) सुब्रमण्यम भारती
(3) रवींद्रनाथ टागोर
(4) सरोजिनी नायडू
भारताचे पहिले आरमारदल कोणत्या शतकात?
(1) 15 वे
(2) 16 वे
(3) 17 वे
(4) 18 वे
शिवाजी : शिवनेरी :: समर्थ रामदास : ?
(1) सज्जनगड
(2) जांब
(3) चाफळ
(4) शिवथरघळ
‘शिवराय सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत’ – कोणाचा दाखला नाही?
(1) मदारी मेहत्तर
(2) कान्होजी जेधे
(3) प्रतापराव गुजर
(4) बाजी घोरपडे
‘बारगीर’ कोणत्या सैन्यदलाशी संबंधित?
(1) घोडदळ
(2) पायदळ
(3) आरमारदल
(4) हेरखाते
मुलभूत अधिकार नाही –
(1) धर्मस्वातंत्र्य
(2) शैक्षणिक व सांस्कृतिक
(3) मतदानाचा अधिकार
(4) घटनात्मक उपाय
किमान 15 व कमाल 45 सदस्यसंख्या कोणत्या संस्थेत?
(1) नगरपंचायत
(2) पंचायत समिती
(3) नगरपरिषद
(4) ग्रामपंचायत
राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब कोणती?
(1) राज्याचे घटनात्मक प्रमुख
(2) राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात
(3) राज्याबाहेरील व्यक्ती असतात
(4) कार्यकारी मंडळात समावेश नसतो
तंतुमय पदार्थ नसलेला पर्याय –
(1) बाजरी
(2) पालेभाज्या
(3) धान्याचा कोंडा
(4) मार्गारिन
‘पेंच-नवेगाव-चांदोली’ यांचा गट कोणता?
(1) शरणवणे
(2) अभयारण्ये
(3) राष्ट्रीय उद्याने
(4) जैवविविधता उद्याने
सह्याद्री पर्वतातील प्रमुख आदिवासी जमाती –
(1) कोरकु-वारली
(2) वारली-कोकणा
(3) कोकणा-भिल्ल
(4) भिल्ल-कोरकु
काळी मृदा वैशिष्ट्य नसणारे विधान –
(1) बेसॉल्ट खडकांचा अपक्षय
(2) टिटॅनिफेरस मॅग्नेटाईटमुळे रंग

(3) पाणी धरून ठेवण्याची क्षमता
(4) रेगूर = गाळाची मृदा
महाराष्ट्रातील सिंचन साधने – सर्वाधिक व सर्वात कमी वापर जोडी?
(1) कालवा-उपसा
(2) कालवा-तलाव
(3) विहीर-उपसा
(4) विहीर-तलाव
रेखावृत्ताचे वैशिष्ट्य –
(1) परस्पर समांतर
(2) लांबी समान
(3) मूळ रेखावृत्त = बृहतवृत्त
(4) 0° रेखावृत्त = विषुववृत्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!