Mahatet Previous Year Question Paper 2021 Marathi

Mahatet Previous Year Question Paper 2021 Marathi

Navnath Lad Learning With Smartness:
भाग 1 : मराठी

  1. ‘साखरवाडी’ या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही.
    (1) साखर
    (2) सार
    (3) वडी
    (4) साडी
  2. ‘धूम ठोकणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?
    (1) वेगाने धावणे
    (2) खूप मार देणे
    (3) कपडे धुणे
    (4) धो धो वाहणे
  3. पुढीलपैकी कोणती रूपे ‘र’ ची नाहीत ?
    (1) सर्व
    (2) सम्राट
    (3) राष्ट्र
    (4) यापैकी नाही
  4. पुढीलपैकी अचूक शब्द कोणता ?
    (1) पुनर्वसन
    (2) पुर्नवसन
    (3) पुनवर्सन
    (4) पुनःवसन
  5. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द ‘क्रियाविशेषण’ या शब्दजातीतील आहेत ?
    (1) अरेरे, शाब्बास
    (2) परंतु, म्हणून
    (3) आता, इकडे
    (4) करिता, साठी
  6. पुढीलपैकी धातुसाधित विशेषणे कोणती ?
    (1) फळ-भाजी
    (2) वाहती नदी
    (3) थोडी पुस्तके
    (4) कोणता गाव
  7. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे?
    (1) गवळी धार काढतो.
    (2) आंबा नासका निघाला.
    (3) मला घरी यावयास रात्र झाली.
    (4) सुनील उद्या पुण्याला जाईल.
  8. मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता ?
    (1) विवेकसिंधू
    (2) लीला-चरित्र
    (3) ज्ञानेश्वरी
    (4) यापैकी नाही
  9. पुढीलपैकी पूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य कोणते ?
    (1) मधून लाडू खाल्ला असेल.
    (2) मधूने लाडू खाल्ला होता.
    (3) मधू लाडू खातो.
    (4) मधूने लाडू खाल्ला आहे.
  10. भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते ?
    (1) त, त, ज, ग, ग
    (2) य, य, य, य
    (3) त, भ, ज, ज, ग, ग
    (4) न, न, म, य, य
  11. संत म्हणति ‘सप्त पदे सहवासे सख्य साधूशी घडते’। या ओळीतील अलंकार कोणता ?
    (1) यमक
    (2) अनुप्रास
    (3) उपमा
    (4) उत्प्रेक्षा
  12. पुढीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणता ?
    (1) भ्
    (2) ल्
    (3) श्
    (4) ह
    पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्न क्र 13 ते 16 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा.
    कोपऱ्यासी गुणगुणत अन् अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवतीचा अंधार तो निमाला हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला ।
    जीभ झालेली ओरडून शोष चार दिवसांचा त्यातही उपास नयन थिजले थरथरती हातपाय रूपे दैन्याचे उभे मूर्त काय ?।।
    कीव यावी पण त्याची कुणाला जात उपहासुनि पसरला कराला तोच येई कुणी परतुनी मजूर बघुनि दीना त्या उधाणून ऊर ।
    म्हणे राहिन दिन एक मी उपाशी परी लागू दे दोन घास यासी खिसा ओतुनि तया ओंजळीत चालू लागे तो दीनबंधू वाट
  13. या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे?
    (1) भाविकाचे
    (2) आजाऱ्याचे
    (3) अपंगाचे
    (4) मूर्तीचे
  14. त्याचे हातपाय का थरथरत होते?
    (1) आजारामुळे
    (2) उपासामुळे
    (3) दमल्यामुळे
    (4) भीक मागितल्यामुळे
  15. ‘दीनबंधू’ कोणास म्हटले आहे?
    (1) भिकाऱ्यास
    (2) धनिकास
    (3) मजुरास
    (4) ईश्वरास
  16. भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले?
    (1) त्याचा ऊर भरून आला.
    2) भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले.
    (3) आपले अन्न त्यास दिले.
    (4) त्याने त्यास शिव्या दिल्या.
  17. ‘केशवसुत’ या टोपणनावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय ?
    (1) प्र. के. अत्रे
    (2) कृ. के. दामले
    (3) रा. ग. गडकरी
    (4) वि. वा. शिरवाडकर
  18. .पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? ताई म्हणाली, आज अजिंक्य किती छान बोलला !
    (1) ?
    (2).
    (3);
    (4) ” “
  19. धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल ?
    (1) चौकशी पत्र
    (2) अभिनंदन पत्र
    (3) तक्रार पत्र
    (4) मागणीपत्र
  20. ‘कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा.
    (1) हजरजबाबी
    (3) तोंडाळ
    (2) वाचाळ
    (4) शब्दप्रभू
  21. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ‘ज्ञानपीठ’ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला ?
    (1) 6 फेब्रुवारी 2015
    (2) 6 मार्च 2015
    (3) 6 जानेवारी 2015
    (4) 6 एप्रिल 2015
  22. पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण?
    (1) फ. मुं. शिंदे
    (2) नागनाथ कोत्तापल्ले
    (3) डॉ. सदानंद मोरे
    (4) मंगेश पाडगावकर
  23. ‘सभा’ या शब्दाचे लिंग कोणते ?
    (1) स्त्रीलिंग
    (2) पुल्लिंग
    (3) नपुंसकलिंग
    (4) उभयलिंग
  24. ‘तुम्ही स्वतःला काय समजता?’ यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता ?
    (1) पुरुषवाचक व आत्मवाचक
    (2) दर्शक व पुरुषवाचक
    (3) प्रश्नार्थक व आत्मवाचक
    (4) संबंधी व सामान्य सर्वनाम
    पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. 25 ते 28 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा.
    महात्मा जोतिबा फुले म्हणतात, ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे, तो जगातील सर्वांत पवित्र माणूस. ज्या मनुष्याला मनाच्या पावित्र्याचे महत्त्व कळत नाही, तो मनुष्य धरणीस भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य नि संपत्ती देते. आळशी मनुष्य हा दुष्ट असतो. तो समावाचा शत्रू बनतो. तो कधीही सुखी होत नाही. उद्योगी आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो. तो अनेकांना सुखी करतो. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते. धैर्यशील मनुष्य हालअपेष्टा सहन करतो आणि संकटावर मात करतो.
  25. जोतिबांच्या मते, जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता ?
    (1) जो मनाने निर्मळ असतो
    (2) ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते.
    (3) जो सर्वांना आवडतो.
    (4) ज्याचे मन सत्यप्रेमी असते.
  26. मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते ?
    (1) निर्दोष व उद्योगी जीवनामुळे.
    (2) निर्दोष व समाधानी जीवनामुळे.
    (3) व्यायाम व व्यवसाय केल्याने.
    (4) दुसऱ्याला व्यवसायात मदत केल्याने.
  27. आळशी मनुष्य कसा असतो ?
    (1) तो समाधानी असतो.
    (2) तो समाजाचा नायक असतो.
    (3) तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो.
    (4) तो आपला वेळ चैनीत घालवतो.
  28. धैर्यशील माणूस कसा ओळखावा ?
    (1) जो दुसऱ्यांनाच फक्त धीर देतो.
    (2) तो धैर्यशील असल्याने लोकांना धैर्याचे महत्त्व पटवून देतो.
    (3) तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो.
    (4) जो सत्यप्रेमी असून स्वतःच्या धैर्यशीलतेचा समाजात प्रचार करतो.
  29. ‘टवटवीत’ शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता ?
    (1) सतेज
    (2) मलूल
    (3) निःसंदेह
    (4) कोरडे
  30. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यातील चूक ओळखून दुरूस्ती सुचवा.
    (1) सुरू करूया -सुरू करू या.
    (2) कार्यक्रमाला – कार्यक्रम
    (3) वेळात – वेळेत
    4) वाक्यात कोणतीही चूक नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!