Mahatet Paper 2 Science 2013 Previous Year Question Paper

  1. कवके गटातील वनस्पती असतात.
    1) सर्व स्वयंपोषी
    2) सर्व परजीवी
    3) सर्व मृतोपजीवी
    4) परजीवी किंवा मृतोपजीवी
  2. फॉस्फोरिक आम्लाची आम्लारीधर्मता असते.
    1) 1
    2) 2
    3) 3
    4) 4
  3. जर एक चेंडू इमारतीच्या छतावरून खाली सोडला, तर तो 3 सेकंदात तळाशी पोहोचतो, तर इमारतीची उंची आहे.
    1) 27.4 मी.
    2) 27 मी.
    3) 49 मी.
    4) 44.1 मी.
  4. गॉल्जी संकुलातील फुग्यासारख्या कोशांना म्हणतात.
    1) जालिका
    2) कुंडे
    3) शिरवा
    4) पिटिका
  5. 125.1 ग्रॅम मोल जडपाणी म्हणजे…….. जडपाणी होय.
    1) 18 ग्रॅम
    2) 19 ग्रॅम
    3) 3 ग्रॅम
    4) 20 ग्रॅम
  6. जर पाण्याला 0 °C पासून तापविले, तर त्याचे आकारमान
    1) वाढते
    2) 4 °C पर्यंत कमी होते.
    3) तसेच राहते
    4) सुरूवातीला वाढते आणि नंतर कमी होते.
  7. मानवामध्ये दुधाचे दात पडून पुन्हा होणाऱ्या दातांची संख्या असते.
    1) 20
    2) 28
    3) 12
    4) 32
  8. टायटन हा चंद्र किंवा उपग्रह …….. या ग्रहाचा आहे.
    1) मंगळ
    2) शुक्र
    3) गुरू
    4) शनी
  9. जेव्हा वस्तू अंतर्वक्र आरशाच्या ध्रुव आणि मुख्य नाभीच्या दरम्यान ठेवली, तेव्हा तिची प्रतिमा असते.
    1) वास्तव, उलट आणि छोटी
    2) वास्तव, उलट आणि मोठी
    3) वास्तव, सुलट आणि मोठी
    4) आभासी, सुलट आणि मोठी
  10. लाजाळूच्या पानाची हालचाल ही हालचाल असते.
    1) कंपकुचित
    2) तापमानुवर्ती
    3) प्रकाशनुवर्ती
    4) अंधारानुवर्ती
  11. जर मोटारकारचा वेग तीन पट केला, तर त्या कारची गतीज उर्जा …….. पट होईल.
    1) 3
    2) 6
    3) 9
    4) 12
  12. प्रयोगशाळेत असेंद्रिय पदार्थापासून सर्वात प्रथम तयार केल्या गेलेला सेंद्रिय पदार्थ …….. हा होय.
    1) युरिया
    2) इथिल अल्कोहोल
    3) मिथेन
    4) इथेन
  13. पूयन म्हणजे ….    होणारे विघटन होय.
    1) कर्बोदकांचे ऑक्सिसूक्ष्मजीवाद्वारे
    2) स्निग्ध पदार्थांचे ऑक्सिसूक्ष्मजीवाद्वारे
    3) कर्बोदकांचे विनॉक्सिसूक्ष्मजीवाद्वारे
    4) प्रथिनांचे विनॉक्सिसूक्ष्मजीवाद्वारे
  14. 134.100 ग्रॅम वस्तूमान असणाऱ्या वस्तूची गतीज उर्जा 20 ज्युल आहे, तर तिचा संवेग किती ?
    1) 2 kg m/s
    2) 1/2 kg m/s
    3) 20 kg m/s
    4) 40 kg m/s
  15. पिवळा फॉस्फरस…….  मध्ये साठवितात.
    1) केरोसिन
    2) पाणी
    3) इथर
    4) अल्कोहोल
  16. फळांना आणि फुलांना मिळणारा नारंगी आणि पिवळा रंग ….. च्या मुळे असतो.
    1) अवर्णलवके
    2) हरितलवके
    3) वर्णलवके
    4) पेशीद्रव्य
  17. .pH प्रमाणलाच प्रमाण …… असे सुद्धा म्हणतात.
    1) केल्व्हीन
    2) सोरेंसन
    3) अॅव्हेगेंड्रो
    4) लेविस
  18. चुंबकत्वाची खरी कसोटी …… ही आहे.
    1) आकर्षण
    2) प्रतिकर्षण
    3) आकर्षण आणि प्रतिकर्षण
    4) चुंबकीय शक्ती
  19. जर अर्धसूत्री विभाजनाने तयार झालेल्या नवीन चार पेशीतील गुणसूत्रांची संख्या प्रत्येकी 3 असेल तर मुळ पेशीतील गुणसूत्रांची संख्या असेल.
    1) 12
    2) 3
    3) 6
    4) 46
  20. 140.27 °C हे तापमान केवलमानप श्रेणीनुसार किती असेल ?
    1) 300 K
    2) 30 K
    3) -300 K
    4) 246 K
  21. अनेक मुलद्रव्यांचे सापेक्ष अणूवस्तूमान पूर्णांकामध्ये नसतात, कारण…..
    1) ते निश्चितपणे काढता येत नाही.
    2) ते काढत असताना अणूचे आयनीभवन घडून येते.
    3) समस्थानिकांचे अस्तित्व
    4) अशुद्धता असल्यामुळे
  22. ‘इश्चेरेचिया कोलाय’ हा जीवाणू मानवी आतड्यांमध्ये ……  निर्मितीत मदत करतो.
    1) जीवनसत्व ब आणि ड
    2) जीवनसत्व ब आणि क
    3) जीवनसत्व अ आणि के
    4) जीवनसत्व ब आणि के
  23. खालीलपैकी कोणती ऊर्जा सूर्याच्या ऊर्जेपासून प्रत्यक्ष मिळविली जात नाही ?
    1) भूऔष्मिक ऊर्जा
    2) लाटांची ऊर्जा
    3) लाकडातील ऊर्जा
    4) जीवाश्म इंधन
  24. पाण्याचा शीतक म्हणून उपयोग केला जातो कारण त्याची …..
    1) कमी घनता
    2) उच्च विशिष्ट उष्माधारकता
    3) कमी विशिष्ट उष्माधारकता
    4) उच्च घनता
  25. रिओ-द-जानिरो येथे 1992 साली झालेल्या वसुंधरा परिषदेत ……. वर भर देण्यात आला.
    1) हवा प्रदूषण नियंत्रण
    2) जागतिक तापमान वाढ नियंत्रण
    3) जैवविविधता संवर्धन
    4) अंटार्किटकांचे संरक्षण
  26. जर विद्युतवाहकाची लांबी आणि काटछेदाचे क्षेत्रफळ अर्धे केले तर त्याचा रोध….
    1) अर्धा होईल
    2) तेवढाच राहील
    3) दुप्पट होईल
    4) चारपट होईल
  27. खालील संतुलित समीकरणातील aFe₂O₃ + bH₂ – dFe + dH₂O. a, b, c आणि d अनुक्रमे असे असतील.
    1) 1, 1, 2, 3
    2) 1, 1, 1, 1
    3) 1, 2, 2, 3
    4) 1, 3, 2, 3
  28. ध्वनी प्रदुषण कायदा 2000 नुसार औद्योगिक परिसरातील महत्तम ध्वनीमर्यादा …… आहे.
    1) 75 dB
    2) 65 dB
    3) 55 dB
    4) 45 dB
  29. LPG मध्ये उग्र वास असणारा …… हा पदार्थ मिसळलेला असतो.
    1) इथेनॉल
    2) इथेनल
    3) इथिल मरकॅप्टन
    4) इथिल ब्युटेन
  30. खालीलपैकी असत्य वाक्य कोणते ?
    1) 1 kg वस्तूमान असणाऱ्या वस्तूचे वजन = 9.8 N
    2) संवेग ही सदिश राशी आहे.
    3) बल ही आदिश राशी आहे.
    4) कोणतेही बाह्य बल नसतांना संवेग कायम असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!