Class 7th Science Chapter: Living World | Adaptation and Classification

सजीव सृष्टी – अनुकूलन व वर्गीकरण

विज्ञान इयत्ता ७ वी
धडा : सजीव सृष्टी – अनुकूलन व वर्गीकरण
प्रश्नपत्रिका
प्रश्न 1) वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीचे खोड प्रकाश संश्लेषण करते कारण—
तेथे पाणी असते 2) त्या वनस्पतींना पाने नसतात 3) खोडावर ऊन येते 4) यापैकी नाही
प्रश्न 2) जलीय वनस्पती पाण्यावर तरंगतात कारण-
1)जलीय वनस्पतीचे खोड व पानाचे देठ यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात 2) त्यांची मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात 3) त्यांना आधार नसतो 4) यापैकी नाही
प्रश्न 3) हिमप्रदेशातील वनस्पती साधारणपणे ——– आकारांच्या असतात.
1)चौकोनी 2) शंकु 3) गोल 4) त्रिकोणी
प्रश्न 4) विषुववृत्तीय प्रदेशातील गवत———- असते.
1)उंच 2) खुरटे 3) बुटके 4) छोटे
प्रश्न 5) अमर वेली सारख्या परपोषी वनस्पतींना आधारक वनस्पतीतून पोषकद्रव्ये शोषून घेण्यासाठी—————- असतात.
1)मुळे 2) पाने 3) फुले 4) चुषक मुळे
प्रश्न 6) जंगलात वनस्पती—————— मिळविण्यासाठी उंच वाढतात.
1)हवा 2) सूर्यप्रकाश 3) पाणी 4) यापैकी नाही
प्रश्न 7) वनस्पतीच्या वाढीसाठी———–,———- व——–आवश्यकता असते.
1)माती ,पाणी, संरक्षण 2) संरक्षण ,वनस्पती, प्राणी 3) नायट्रोजन, फॉस्फरस ,पोटॅशियम 4) प्राणी ,पक्षी ,माती
प्रश्न 8) घटपर्णी वीनस ड्रॉसेरा यासारख्या वनस्पती कीटकांचे भक्षण करून ————गरज भागवतात.
1)पोटॅशियम 2) फॉस्फरस 3) नायट्रोजन 4) यापैकी नाही
प्रश्न 9) चुकीची जोडी ओळखा.
1)घटपर्णी – कीटक भक्षी वनस्पती 2) अमरवेल – परपोशी वनस्पती 3) आंबा – स्वयंपोषी वनस्पती 4) ड्रॉसेरा – परपोशी वनस्पती
प्रश्न 10) अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळा सारखे———- असतात.
1)देठ 2) तंतू 3) पाने 4) फुले
प्रश्न 11) रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांची किती गटात विभागणी केली आहे?
1)तीन 2) पाच 3) सहा 4) चार
प्रश्न 12) जीवन पद्धती नुसार वर्गीकरण करा (6 गुण)
भक्षक : __
विघटक : __
उत्पादक : __
वनस्पती : __ प्राणी : __ कवके : ____
प्रश्न 13) हिवताप किंवा मलेरिया कोणत्या आदिजीवामुळे होतो ?
1)प्लाज्मोडियम व्हायवॅक्स 2) कॅन्डीडा 3) पॅरामेशिअम 4) यापैकी नाही
प्रश्न 14) आमांश कशामुळे होतो?
1)प्लाज्मोडियम व्हायवॅक्स 2) कॅन्डीडा 3) पॅरामेशिअम 4) एन्टामिबा हिस्टोलिटिका
प्रश्न 15) राष्ट्रीय विषाणू संस्था या संस्थेची स्थापना 1952 या वर्षी कोठे करण्यात आली ?
1)नाशिक 2) पुणे 3) नागपूर 4) मुंबई
प्रश्न 16) कवके स्वयंपोषी नाहीत.
1)हे विधान बरोबर आहे 2) हे विधान चूक आहे
प्रश्न 17) दुधाचे दह्यात रूपांतर होताना काय निर्माण होते ?
1)ऍसिटिक आम्ल 2) लॅक्टिक आम्ल 3) सल्फ्यूरिक आम्ल 4) हायड्रोक्लोरिक आम्ल
प्रश्न 18) खालील पैकी सर्वात लहान व सर्वात मोठा आकार कोणाचा आहे ती जोडी ओळखा ?
1)कवक व जीवाणू 2) शैवाल व जीवाणू 3) विषाणू व शैवाल 4) विषाणू व कवक
प्रश्न 19) __ मृतोपजीवी असून ती कार्बनी पदार्थांपासून अन्न पोषण करतात.
1)कवके 2) यापैकी नाही 3) आदिजीव 4) विषाणू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!