महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET)
विषय : बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र (2021)
सूचना :
प्रत्येक प्रश्नास चार पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडा.
प्रत्येक प्रश्नास 1 गुण.
प्रश्न 61 ते 90
61. अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही?
(1) प्रभुत्त्व अध्ययन उपपत्ती
(2) क्षेत्रीय उपपत्ती
(3) सामाजिक अध्ययन उपपत्ती
(4) माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान
62. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो, ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली?
(1) बांदूरा
(2) ब्लूम
(3) ब्रुनर
(4) आसूबेल
63. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत?
अ) चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी
ब) स्वतंत्र विचार करण्याची क्षमता
क) नीर विवेक बुद्धि
ड) समस्येची उकल करण्याची कुवत
(1) अ, ब आणि क
(2) अ, ब आणि ड
(3) ब, क आणि ड
(4) अ, ब, क, ड सर्व
64. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगांचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे?
(1) ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने
(2) व्यक्तिगत विकास प्रतिमाने
(3) सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने
(4) वर्तन परिवर्तन प्रतिमाने
65. खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही?
(1) अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडते
(2) प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करतो
(3) सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखेच असते
(4) अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे
66. “अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय.” अशी व्याख्या कोणी केली?
(1) फ्रैंडसेन
(2) मर्फी
(3) वुडवर्थ
(4) गिलफर्ड
67. अध्ययन करतांना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून काय करावे?
अ) विद्यार्थ्यामध्ये अभिरूची निर्माण करावी
ब) प्रेरकाची तीव्रता कमी करावी
क) चुकीच्या सवयी आत्मसात होऊ देऊ नयेत
ड) वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष द्यावे
(1) अ आणि ब
(2) अ आणि क
(3) अ आणि ड
(4) ब आणि क
68. अध्ययनाची व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या योग्य जोड्या निवडा.

(1) i-ड, ii-अ, iii-क, iv-ब
(2) i-अ, ii-ड, iii-क, iv-ड
(3) i-ड, ii-क, iii-अ, iv-क
(4) i-ब, ii-ड, iii-अ, iv-ड
69. अभिसंधानाचे उदाहरण नाही ते कोणते?
(1) अध्ययनार्थ्यांची वृत्ती बदलता येते
(2) अकारण भीती नष्ट करता येते
(3) चमत्कारिक वर्तन बदलणे अशक्य असते
(4) योग्य सवयी लावता येतात
70. भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद कोणत्या अनुवंशाच्या नियमानुसार दिसतात?
(1) साधर्म्याचा नियम
(2) विविधतेचा नियम
(3) परागमनाचा नियम
(4) पुनरावृत्तीचा नियम
71. फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येणारा घटक कोणता?
(1) स्वभाव व वृत्ती
(2) पक्वतेचे वय
(3) बुद्धिमत्ता
(4) डोळ्यांचा व शरीराचा रंग
72. संवेदनेबाबत योग्य विधान कोणते?
(1) संवेदना फक्त आंतरिक प्रक्रिया आहे
(2) इच्छा असेल तरच संवेदना होते
(3) संवेदनात व्यक्ती सक्रिय असते
(4) संवेदन प्रक्रिया ही मनाचा अकरणरूप व्यापार आहे
73. भास होणे हे कोणत्या इंद्रियभ्रमामुळे होते?
(1) परिचितता
(2) भौमितिक इंद्रियभ्रम
(3) विशिष्ट मनःस्थिति
(4) विशिष्ट भौतिक परिस्थिती
74. ज्ञानेंद्रिय उद्दिपीत न होता एखादया पुर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे?
(1) प्रतिमा स्थिर असतात
(2) प्रतिमांची तीव्रता सारखीच असते
(3) पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा होत नाही
(4) सर्व प्रतिमा सारख्याच असतात
75. कल्पनाविष्कारासाठी शिक्षकाने काय राबवावे?
(1) अ, ब, क फक्त
(2) अ, क, ड फक्त
(3) अ, ब, ड फक्त
(4) अ, ब, क, ड सर्व
76. मन यांच्या मते जुळवाजुळव करणे म्हणजे—
(1) स्मरण
(2) बुद्धी
(3) विचार
(4) प्रेरणा
77. काकतालीय न्याय हा अडथळा कोणत्या विचार प्रक्रियेत येतो?
(1) प्रतिकूल ग्रह
(2) काकतालीय न्याय
(3) इच्छानुगामी विचार
(4) निरीक्षणातील दोष
78. धारणेचे योग्य वैशिष्ट्य कोणते?
(1) पाठोपाठ कविता केल्यास परिणाम होत नाही
(2) बोधावस्थेतील धारणा पटकन आठवते
(3) उपबोधावस्थेतील धारणा पटकन आठवते
(4) अबोधावस्थेतील बाबी प्रयत्नाने आठवतात
79. विस्मरणाबद्दल अयोग्य वैशिष्ट्य कोणते?
(1) विस्मरण महत्वाचे आहे
(2) स्मरणासाठी विस्मरण गरजेचे आहे
(3) धारणा कमी तितके विस्मरण कमी
(4) धारणा जास्त तितके विस्मरण कमी
80. आंतरिक प्रेरणेबाबत अयोग्य विधान कोणते?
(1) विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे
(2) अभिरुचीशी निकटचा संबंध आहे
(3) प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत
(4) अभिरुची हा पाया आहे
81. स्पिअरमनच्या द्विघटक उपपत्तीबाबत योग्य विधान कोणते?
(1) सामान्य घटक मोठा असतो
(2) विशेष घटक मोठा असतो
(3) क्षमतांना विकासपूरक सामान्य घटक असतो
(4) विशेष घटक सर्व कार्यात उपयुक्त असतो
82. भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी दिली?
(1) आल्फ्रेड बीने
(2) डेव्हीड वेश्लर
(3) पीटर सॅलोव्ही
(4) हॉवर्ड गार्डनर
83. लेवीनचे मानसिक संघर्षाचे प्रकार व उदाहरणांची योग्य जुळणी निवडा.

(1) i-अ, ii-ब, iii-क
(2) i-ब, ii-क, iii-अ
(3) i-क, ii-ब, iii-अ
(4) i-ब, ii-अ, iii-क
84. “मी अभ्यास केला नाही तरी गुण मिळाले” असे म्हणणे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण?
(1) तादात्म्य
(2) नकारात्मकता
(3) प्रतिपूरण
(4) कृतकसमर्थन
85. सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणी मांडली?
(1) पॅव्हलॉव्ह
(2) बॅग्ले
(3) जडड्
(4) थॉर्नडाईक
86. शैशवावस्थेत नवीन अनुभव समाविष्ट करण्याची प्रक्रिया कोणती?
(1) अभिमुखीकरण
(2) आत्मसातीकरण
(3) संधारण
(4) समावेशन
87. किशोरावस्थेतील भावनिक विकासाबाबत योग्य बाब कोणती?
(1) अर्थ समजून पाठांतर करतात
(2) अवधानकक्षा अमर्यादित असते
(3) नीती-अनीतीची जाणीव असते
(4) पाठ केलेले विसरत नाहीत
88. मंदगतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत अयोग्य बाब कोणती?
(1) बुद्धिमत्ता सामान्य असते
(2) हे मंदबुद्धी असतात
(3) सर्वसामान्यांच्या तुलनेत मागे पडतात
(4) नैदानिक चाचणी आवश्यक असते
89. व्यक्तिमत्त्वाची गतिशील व्याख्या कोणी दिली?
(1) नॉर्मन एल मन
(2) जी. डब्ल्यू. ऑलपोर्ट
(3) जी. ए. किंबल
(4) जे. बी. वॅटसन
90. अॅड्रेनलिनचे प्रमाण कमी झाल्यास काय दिसते?
(1) पौरूषत्त्व दिसते
(2) स्वास्थ्य जाणवते
(3) व्यक्ती अशक्त दिसते
(4) व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते