Mahatet Exam 2013 Marathi
पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न- क्रमांक 31 ते 34च्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा :
फ्रेंच माणूस आपल्या स्वतःच्या भाषेवर बेहद प्रेम करतो. भाषा ही त्याची प्राणसखीच ! तो जगतो किंवा झुरतो ते तिच्यासाठी ! ‘ हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू’ असे तो केवळ कवितेत म्हणत नाही तर तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी तो मिशनरी वृत्तीने झटतो आणि प्रसंगी झगडतोही ! एखादा नवीन शब्द शब्दकोशात समाविष्ट करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी सर्वोच्च फ्रेंच अकादमीची मान्यता मिळवावी लागते. सर्व प्रकारच्या अग्निपरीक्षांतून पार पडल्यानंतरच त्या शब्दाला शब्दकोशात मानाचं स्थान मिळतं.
भाषा हे संपर्काचं एक साधन आहे, तेव्हा भाषेच्या अभिमानानं माणसानं माथेफिरू होऊ नये हे खरं आहे, परंतु त्याचबरोबर भाषा ही समाजपुरुषाच्या जीवनाला चेतना देणाऱ्या रक्तासारखी आहे. ती दूषित होणार नाही, याकडेही लक्ष पुरविणं आवश्यक आहे.
फ्रेंचाप्रमाणे जर्मन लोकांनाही आपल्या भाषेविषयी प्रेम आहे. आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून त्यांनी जगभर केंद्रे काढली आहेत, परंतु त्याचबरोबर अन्य भाषांवरही त्यांचं प्रेम आहे. जर्मन पंडितांचं संस्कृत भाषेवरचं प्रेम सर्वज्ञात आहे. संस्कृतचा अभ्यास भारतापेक्षा जर्मनीत अधिक होत असावा.
- भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे ?
(1) माथेफिरू माणसाची (2) समाजपुरुषाची (3) समाजपुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची (4) दूषित रक्ताची
32.भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला ?
(1) भारत (2) जर्मनी (4) फ्रान्स (3) इंग्लंड - जर्मन पंडितांचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे ?
(1) जर्मनी (2) संस्कृत (3) फ्रेंच (4) इंग्रजी
34.आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता ?
(1) जर्मनी (2) फ्रान्स (3) इंग्लंड (4) भारत
35.महानायक, संभाजी, पानिपत या कादंबऱ्यांचे लेखन कोणी केले आहे ?
(1) रणजित देसाई ( 2 ) विश्वास पाटील ( 3 ) शंकर पाटील (4) शिवाजी सावंत
36.“ रोज कुठल्यातरी फॅक्टरीतला पाचचा भोंगा वाजत असे.” या वाक्याचा काळ ओळखा :
(1) रिती वर्तमानकाळ (2) रिती भविष्यकाळ (3) रिती भूतकाळ (4) अपूर्ण भूतकाळ
37.“ आपला आशीर्वाद असावा.” या वाक्याचा प्रकार कोणता ?
(1) संकेतार्थी (2) स्वार्थी (3) आज्ञार्थी (4) विध्यर्थी
38.’विद्वान’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
(1) देशी (2) परभाषीय (3) तत्सम (4) तद्भव
39.“ सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले.” या वाक्यातील प्रयोग ओळखा :
(1) भावकर्तरी (2) भावे (3) कर्मणी (4) कर्तरी - ‘म-स -ज- स -त- त- ग’ हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?
(1) नववधू ( 2 ) भुजंग प्रयात (3) शार्दूलविक्रीडित (4) इंद्रवज्रा - पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?
(1) दुष्काळ (2) दुर्जन (3) निष्कारण (4) निष्फळ
42.नागनाथ कोलापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्यशासनाचा पुरस्कार प्राप्त झालाआहे ?
(1) मूडस (2) राजधानी (3) गांधारीचे डोळे (4) जोतिपर्व
पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा :
( 1 ) नाविन्य (2) प्रतिक्षागृह (3) परीक्षा (4) आध्यात्मिक
44.जयंताने मध्येच विचारले, ‘कोण होते ?’ या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत ?
(1) 1 (2) 2 (3) 3 (4) 4
45.पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा:
‘अश्व’
(1) वारु (2) हय (3) तुरंग (4) शाखामृग
46 ते 49 पुढील पद्य वाचून प्रश्न क्रमांक 46 ते 49ची उत्तरे पर्यायातून निवडा :
पीक खुशीत डोलतंया भारी,
भरला आनंद समदया शिवारी.
बगून पाचूचं रान,
आमचं हरपलं देहभान.
आज रानाची शोभा न्यारी….
आल्या सरसर भुईवर धारा,
ताप मातीचा सरला सारा.
समदं शिवार फुलून आलं,
बगून मन हे भुलून गेलं.
गेल्या भुलून दिशाही चारी…….
दाट पिकांनी सजली शेतं,
पीक मजेत गिरकी घेतं.
गार वारं हे झुळझुळ व्हातं, पानापानांत गाणी गातं.
गाती पानात पाकरं ही सारी….
काळ्या आईची कराया पूजा, राबराबला शेतकरी राजा.
ऊनातानात घाम त्यानं शिपला,
मला मोत्यांचा मातीत पिकला.
आली सोन्याची दौलत दारी……
46..शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो ?
(1) शेतात कष्ट करतो. (2) काळ्या आईची ओटी भरतो. ( 3 ) रानात पूजा करतो. (4) शेतीला आई मानतो.
47.शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपते ?
(1) निसर्गाचे (2) पावसाचे (3) शेतकऱ्याचे (4) वाऱ्याचे
48.कवितेतील ‘मोत्यांचा मळा’ या शब्दाचा समर्पक अर्थ काय ?
(1) पाखरे (2) झरा (3) शेतातील पीक (4) संपत्ती
50.कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे ?
(1) पाचू (2) मोती (3) सोने (4) माणिक
51.’जहाल’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा :
(1) उग्र (2)तिखट (3) मवाळ (4) जलाल
51.पुढील म्हण पूर्ण करा
‘पदरी पडले झोंड,
(1) हासून केले गोड (2) रडून केले खोंड ( 3 ) हसत झेलली धोंड (4) मारुन केले गोड
52.ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, असा समास
कोणता ?
(1) अव्ययीभाव (2) बहुव्रीही (3) द्वंद्व (4) तत्पुरुष
53.पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा :
(1) भव्यता (2) सौंदर्य (3) दातृत्व (4) स्वतंत्र
54.साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात ?
(1) दृष्टान्त (2) स्वभावोक्ती (3) अनन्वय (4) चेतनागुणोक्ती
55.पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा :
(1) क्लास (2) कंपनी (3) ट्रंक (4) पेन्सिल
- पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा :
(1) घरे (2) लिंबे (3) फोटो (4) पिले - पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे ?
“ मुलांनी आज्ञा पाळावी.”
(1) चतुर्थी अनेकवचनी (2) द्वितीया अनेकवचनी (3) षष्ठी अनेकवचनी ( 4 ) तृतीया अनेकवचनी
58.नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे ?
( 1 ) तक्रार अर्ज (2) मागणी अर्ज (3) कौटुंबिक पत्र ( 4 ) व्यावसायिक पत्र
59.पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते ?
(1) च् (2) ग् (3) ड् (4) द्
60.पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्यरूपामुळे बदल झाला आहे ? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली.
(1) एक (2) दोन (3) तीन (4) चार