मराठी व्याकरण काळ आणि काळाचे प्रकार
मराठी व्याकरण सराव प्रश्नपत्रिका
विषय : काळ व काळाचे प्रकार
सूचना : प्रत्येक प्रश्नास २ गुण आहेत. योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
१) मी निबंध लिहित जाईन. (या वाक्याचा काळ ओळखा.)
अ) रीती भूतकाळ
आ) अपूर्ण वर्तमानकाळ
इ) रीती भविष्यकाळ
ई) अपूर्ण भविष्यकाळ
२) सागर मैदानावर खेळत होता. (काळ ओळखा.)
अ) अपूर्ण भूतकाळ
आ) रीती भूतकाळ
इ) पूर्ण भूतकाळ
ई) अपूर्ण वर्तमानकाळ
३) मी अभ्यास करीन.
अ) साधा भूतकाळ
आ) साधा भविष्यकाळ
इ) रीती भविष्यकाळ
ई) साधा वर्तमानकाळ
४) मी पत्र लिहित असतो.
अ) पूर्ण वर्तमानकाळ
आ) अपूर्ण वर्तमानकाळ
इ) रीती वर्तमानकाळ
ई) साधा वर्तमानकाळ
५) मयूर दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचत असे. (या वाक्याचा काळ ओळखा.)
अ) अपूर्ण भूतकाळ
आ) रीती वर्तमानकाळ
इ) पूर्ण भूतकाळ
ई) रीती भूतकाळ
६) ताई मुलांना गोष्ट सांगते. (या वाक्याचे रीती वर्तमानकाळात रुपांतर करा.)
अ) ताई मुलांना गोष्ट सांगत असते.
आ) ताई मुलांना गोष्ट सांगत आहे.
इ) ताईने मुलांना गोष्ट सांगितली आहे.
ई) ताई मुलांना गोष्ट सांगत असे.
७) त्यांनी तीर्थयात्रा केली आहे. (या वाक्याचा काळ ओळखा.)
अ) पूर्ण वर्तमानकाळ
आ) रीती वर्तमानकाळ
इ) पूर्ण भूतकाळ
ई) पूर्ण भविष्यकाळ
८) रीती वर्तमानकाळातील वाक्य ओळखा.
अ) परमेश्वर सर्वांचे रक्षण करतो.
आ) सुधाकर चित्रपट पाहत असतो.
इ) श्रेयस कादंबरी वाचत आहे.
ई) मी रोज पहाटे उठतो.
९) अपूर्ण वर्तमानकाळी क्रियापद ओळखा.
अ) खात होता.
आ) खाल्ले आहे.
इ) खात असे.
ई) खात आहे.
१०) सुलभ आणि चित्र काढले असेल. (या वाक्याचा काळ ओळखा.)
अ) अपूर्ण भविष्यकाळ
आ) पूर्ण भविष्यकाळ
इ) रीती भविष्यकाळ
ई) पूर्ण वर्तमानकाळ
११) मुले मैदानावर खेळत आहेत.
अ) साधा वर्तमानकाळ
आ) अपूर्ण वर्तमानकाळ
इ) पूर्ण वर्तमानकाळ
ई) रीती वर्तमानकाळ
१२) आई स्वयंपाक करत असते.
अ) रीती भूतकाळ
आ) रीती भविष्यकाळ
इ) रीती वर्तमानकाळ
ई) अपूर्ण वर्तमानकाळ
१३) चालक गाडी चालवत होता.
अ) अपूर्ण भविष्यकाळ
आ) अपूर्ण भूतकाळ
इ) साधा भूतकाळ
ई) अपूर्ण वर्तमानकाळ
१४) मी दररोज गोष्ट वाचत जाईन.
अ) रीती वर्तमानकाळ
आ) अपूर्ण वर्तमानकाळ
इ) रीती भूतकाळ
ई) रीती भविष्यकाळ
१५) वैष्णव अभ्यास करत आहे.
अ) पूर्ण वर्तमानकाळ
आ) साधा वर्तमानकाळ
इ) रीती वर्तमानकाळ
ई) अपूर्ण वर्तमानकाळ
१६) मी दररोज खेळत असेन.
अ) साधा वर्तमानकाळ
आ) अपूर्ण वर्तमानकाळ
इ) अपूर्ण भूतकाळ
ई) अपूर्ण भविष्यकाळ
१७) अपूर्ण वर्तमानकाळ असणारे वाक्य ओळखा.
अ) मुले मैदानावर खेळले आहे.
आ) मुले मैदानावर खेळत असतात.
इ) मुले मैदानावर खेळत आहे.
ई) मुले मैदानावर खेळतात.
१८) रीती वर्तमानकाळ असणारे वाक्य ओळखा.
अ) मुले मैदानावर खेळतात.
आ) मुले मैदानावर खेळले आहे.
इ) मुले मैदानावर खेळत असतात.
ई) मुले मैदानावर खेळत आहे.
१९) रीती भविष्यकाळ असणारे वाक्य ओळखा.
अ) मी पेरू खाल्ला असेन.
आ) मी पेरू खात असेन.
इ) मी पेरू खात जाईन.
ई) मी पेरू खाईल.
२०) पूर्ण भविष्यकाळ असणारे वाक्य ओळखा.
अ) मी पेरू खात असेन.
आ) मी पेरू खाईल.
इ) मी पेरू खात जाईन.
ई) मी पेरू खाल्ला असेन.
वरील प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील टेस्ट सोडवा.
Marathi Grammar |Tense and Its Types