Types of Sentences in Marathi – For Scholarship & Competitive Exams

वाक्याचे प्रकार

वाक्याचे प्रकार
1) ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास ‘विधानार्थी’ वाक्य म्हणतात.
उदा. माझा मुलगा आज अमेरिकेला गेला.
2) ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास ‘प्रश्नार्थी’ वाक्य म्हणतात.
उदा. तुझी परीक्षा कधी आहे?
3) ज्या वाक्यात भावनेचा उद्‌गार काढलेला असतो, त्यास ‘उद्‌गारार्थी’ वाक्य म्हणतात. उदा. अबब! केवढी मोठी इमारत ही !
4) ज्या विधानात होकार असतो, त्या वाक्यास ‘होकारार्थी’ वाक्य म्हणतात. ज्या विधानात नकार असतो त्याला ‘नकारार्थी’ वाक्य म्हणतात.
उदा. 1) स्नेहा नृत्य करते.
2) नगरकरांची सीमा नृत्य करत नाही.
या होकारार्थी व नकारार्थी वाक्यांनाच अनुक्रमे ‘करणरूपी’ व ‘अकरणरूपी’ वाक्ये म्हणतात.
वाक्यातील विधानावरून वाक्याचे प्रकार :
1) स्वार्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास ‘स्वार्थी वाक्य’ म्हणतात.
2) आज्ञार्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास ‘आज्ञार्थी वाक्य’ म्हणतात.
3) विध्यर्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास ‘विध्यर्थी वाक्य’ म्हणतात.
4) संकेतार्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमूक केले असते तर अमूक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास ‘संकेतार्थी वाक्य’ म्हणतात.
याशिवाय एका वाक्यात किती विधाने असतात. त्यावरून वाक्याचे आणखी तीन प्रकार मानले जातात.
1) केवल वाक्य : ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास ‘केवल’ किंवा ‘शुद्ध’ वाक्य म्हणतात. हे केवल वाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकेल.
2) मिश्रवाक्य : पुढील वाक्य जसे जे चकाकते ते सोने नसते. जे गरजते ते बरसत नाही. एक प्रधानवाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास ‘मिश्रवाक्य’ असे म्हणतात.
3) संयुक्त वाक्य : दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते त्यास ‘संयुक्त वाक्य’ म्हणतात.

वाक्याचे प्रकार यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न

1) विधानार्थी वाक्याबाबत पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता ?
1) विधानार्थी वाक्य हे प्रश्नार्थी वाक्य असते.
2) विधानार्थी वाक्य हे उद्‌गारार्थी वाक्य असते.
3) विधानार्थी वाक्य होकारार्थी तसेच नकारार्थीही असते.
4) वरीलपैकी सर्वच बरोबर.
2) ‘लहानांनी थोरांचा आदर करावा.’ या वाक्याचा प्रकार कोणता ?
1) नकारार्थी वाक्य
2) उद्‌गारार्थी वाक्य
3) विध्यर्थी वाक्य
4) प्रश्नार्थी वाक्य
3) ‘छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले.’ या वाक्याचा प्रकार कोणता ?
1) केवल वाक्य
2) संयुक्त वाक्य
3) मिश्र वाक्य
4) नकारार्थी वाक्य
4) पुढीलपैकी संयुक्त वाक्य कोणते ते ओळखा.
1) मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
2) देश तसा वेश.
3) जो गर्जेल तो पडेल काय?
4) जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.
5) खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते ते ओळखा.
1) अकाशात ढग जमले आणि पावसास सुरुवात झाली.
2) पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते.
3) आपण चहा घेणार की कॉफी घेणार?
4) कार्य सफल व्हावे, म्हणून त्यांनी खूप मेहनत केली.
6) ‘त्याने चोरी केली म्हणून पोलिसाने त्यास पकडले.’ या वाक्याचा प्रकार कोणता ?
1) केवल वाक्य
2) मिश्र वाक्य
3) संयुक्त वाक्य
4) यापैकी नाही
7) पुढील मिश्र वाक्य नसलेला पर्याय ओळखा.
1) त्याची गाडी चुकली म्हणून त्याला उशीर झाला.
2) श्रीराम म्हणून एक राजा होऊन गेला.
3) चांगली नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला.
4) तप करता यावे म्हणून त्याने संन्यास घेतला.
8) पुढील वाक्याचा प्रकार कोणता ?
 ‘तुम्हाला संपत्ती हवी; की सुख हवे’ ?
1) मिश्र वाक्य
2) संयुक्त वाक्य
3) केवल वाक्य
4) उद्‌गारार्थी वाक्य
9) पुढे दिलेल्या पर्यायातून मिश्र वाक्याचा पर्याय शोधा.
1) देह जावो अथवा राहो
2) तू इशारा केलास; की मी येईन.
3) त्यांनी लिहावे किंवा बोलावे.
4) आपणास जेवण हवे; की नाष्टा हवा.
10) पुढीलपैकी केवल वाक्य कोणते ते शोधा.
1) मराठवाड्यात दुष्काळ पडला.
2) वारा आला आणि पाऊस गेला.
3) गड आला; पण सिंह गेला.
4) गुरुजी म्हणाले, की नेहमी खरे बोलावे.
11) पुढीलपैकी संयुक्त वाक्य कोणते ?
1) संध्याकाळ झाली, तेंव्हा पाखरे घरट्याकडे परतली.
2) वर्गात यायचं असेल, तर परवानगी घ्या.
3) शाळेची घंटा झाली, तेंव्हाच विद्यार्थी वर्गातून बाहेर आले.
4) गौरी आजारी होती, म्हणून ती शाळेत गैरहजर राहिली.
12) खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते ?
1) मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही.
2) मला ताप आला आहे. म्हणून मी शाळेत जाणार नाही.
3) मी शाळेस जाणार नाही; कारण मला ताप आला आहे..
4) यापैकी नाही
13) पुढीलपैकी वाक्य प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता ?
1) तो फरशीवरून चालताना पाय घसरून पडला.
2) मी चहा पितो हे माझ्या आईला आवडत नाही.
3) माझ्या बाबांनी मला गोड खाऊचा डबा पाठविला.
4) वाटेत मोटार नादुरूस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला.
14) पुढीलपैकी होकारार्थी वाक्य कोणते ?
1) कोणीही गोंधळ करू नये.
3) येथे धुंकण्यास सक्त मनाई आहे.
2) येथे थुंकू नये.
4) खाडाखोड करू नये.
15) खालील वाक्याचा प्रकार कोणता ?
‘प्रथम क्रमांक यावा यास्तव त्याने खूप अभ्यास केला’.
1) संयुक्त वाक्य
2) मिश्र वाक्य
3) केवल वाक्य
4) नकारार्थी वाक्य

वाक्याचे प्रकार वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे.

प्रश्न 1. विधानार्थी वाक्य होकारार्थी तसेच नकारार्थी असते .
प्रश्न 2. विद्यार्थी वाक्य
प्रश्न 3. केवल वाक्य
प्रश्न 4. मरावे परी कीर्ती रुपी उरावे.
प्रश्न 5. कार्य सफल व्हावे, म्हणून त्यांनी खूप मेहनत केली.
प्रश्न 6. संयुक्त वाक्य
प्रश्न 7. त्याची गाडी चुकली म्हणून त्याला उशीर झाला.
प्रश्न 8. संयुक्त वाक्य
प्रश्न 9. तू इशारा केलास; की मी येईन.
प्रश्न 10. मराठवाड्यात दुष्काळ पडला.
प्रश्न 11. गौरी आजारी होती, म्हणून ती शाळेत गैरहजर राहिली.
प्रश्न 12. मी शाळेत जाणार नाही: कारण मला ताप आला आहे.
प्रश्न 13. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला.
प्रश्न 14. येथे थुंकण्यास सक्त मनाई आहे.
प्रश्न 15. मिश्र वाक्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!