Free Online Test on Marathi Adverbs (Kriyavisheshan Avyay) with answers

मराठी व्याकरण क्रियाविशेषण अव्यय

लिंग, वचन किंवा विभक्ती यांमुळे त्या शब्दांच्या रूपात बदल होत नाही. याला व्याकरणात अविकारी शब्द म्हणतात. यांनाच अव्यये (न बदलणारी) म्हणतात.

अविकारी शब्द (अव्यये) :

1) क्रियाविशेषण अव्यये
2) शब्दयोगी अव्यये
3) उभयान्वयी अव्यये
4) केवलप्रयोगी अव्यये

1) क्रियाविशेषण अव्यये :
क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यये म्हणतात.
उदा. महेश मोठ्याने बोलतो. 
राधा मोठ्याने बोलते.
 ते मोठ्याने बोलतात.
वरील तिन्ही वाक्यात कर्त्याचे लिंग, वचन बदलले तरी बोलतो या क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द मोठ्याने तसाच राहिला आहे.

क्रियाविशेषण अव्यये प्रकार :
1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यये
2) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये
3) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये
4) संख्यावाचक/परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये

1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यये :
जी अव्यये क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवितात त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यये म्हणतात.
उदा. सुरेश परवा गावाला जाईल. ‘परवा’ या शब्दावरून क्रियेचा काळ दिसून येतो.
उदा. सध्या, तूर्त, उद्या, परवा, पूर्वी, सदा, सर्वदा, वारंवार, फिरून, सालोसाल इ.

2) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये :
जी अव्यये क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दाखवितात. त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये म्हणतात.
उदा. नदीच्या अलीकडे गाव आहे. अलीकडे शब्दावरून ठिकाण किंवा स्थळाचा बोध होतो.
उदा. तेथे, येथे, जेथे, खाली, वर, कोठे, अलीकडे, सभोवार, पलीकडे, पुढे, मागे, इकडे, तिकडे, तेथून, मागून, पुढून, इकडून, तिकडून, वरून, खालून, दुरून, लांबून.

3) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये :

वाक्यात जी अव्यये क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दर्शविले जाते त्यास रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये म्हणतात.
उदा. महेश उभ्याने गटागटा पाणी पितो. पाणी पिण्याची क्रिया कशी घडते याचे उत्तर गटागटा या शब्दातून मिळते.
उदा. कसे, तसे, व्यर्थ, फुकट, मुद्दाम, हळू, सावकाश, जलद, उगीच, झटकन, पटकन, गटगट, पटपट, भराभर
4) संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये :
जी अव्यये क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेचे परिमाण दाखवितात त्यांना संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये म्हणतात. उदा. आम्ही भरपूर पाणी प्यालो.
वरील वाक्यात पाणी किती पिले याचे उत्तर मिळते. उदा. नेहमी, भरपूर, अनेकदा, किंचित, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, भरपूर, अतिशय, मुळीच, बिलकूल, मोजके, बहुत, पूर्ण, थोडा इ.

क्रियाविशेषण अव्यये प्रकार

  1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यये :
    1) कालदर्शक : सध्या, तूर्त, हल्ली, उद्या, परवा, लगेच, पूर्वी, मागे, आता, आधी
    2) सातत्यदर्शक : नेहमी, नित्य, सदा, सर्वदा, सतत अद्यापि, आजकाल
    3) आवृत्तिदर्शक : पुनःपुन्हा, दररोज, वारंवार, सालोसाल, क्षणोक्षणी
  2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये :
    1) स्थितीदर्शक : येथे, तेथे, जेथे, खाली, वर, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकडे-तिकडे, सभोवार
    2) गतिदर्शक : इकडून, तिकडून, दूर, लांब, तेथून, मागून, पुढून, वरून, खालून
  3. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये :
    1) प्रकारदर्शक : असे, कसे, तसे, आपोआप, मुद्दाम, हळू, सावकाश, जलद
    2) अनुकरणदर्शक : झटकन, पटकन, पटपट, टपटप, गरगर, चमचम, भराभर
    3) निश्चयार्थक : खचित, खरोखर
  4. संख्यावाचक/परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये :
    किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकूल, भरपूर, बहुत, अतिशय, मोजके, पूर्ण

मराठी व्याकरण – क्रियाविशेषण अव्यय
प्रश्नपत्रिका
प्रश्न 1) वाक्यातील क्रिया विषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ———- म्हणतात.
(1) केवलप्रयोगी अव्यय
(2) क्रियाविशेषण अव्यय
(3) विशेषण
(4) शब्दयोगी अव्यय
प्रश्न 2) क्रिया कितीदा घडली हे दर्शविणारा शब्द म्हणजे ——— होय.
(1) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 3) क्रिया कोठे घडली हे दर्शविणारा शब्द म्हणजे ——— होय.
(1) परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 4) क्रिया केव्हा घडली हे दर्शविणारा शब्द म्हणजे ——— होय.
(1) परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 5) क्रिया कशा तऱ्हेने घडते हे दर्शविणारा शब्द म्हणजे ——— होय.
(1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 6) क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा –
मी गावाला जाताना अनेकदा एसटीने प्रवास करायचो. (अनेकदा)
(1) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 7) आज काल रस्त्यावर खूप गर्दी वाढली आहे. (आज काल)
(1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 8) झटपट अभ्यास करावा. (झटपट)
(1) परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 9) पुढीलपैकी कोणते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही?
(1) भरपूर
(2) सर्वत्र
(3) पुढे
(4) सभोवती
प्रश्न 10) पुढीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही?
(1) सतत
(2) आता
(3) पूर्वी
(4) आसपास
प्रश्न 11) कंसातील शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा –
कासव (हळू) चालते.
(1) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 12) बागेत (भरपूर) फुलझाडे आहेत.
(1) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 13) गावाच्या (पलीकडे) एक नदी आहे.
(1) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 14) (पूर्वी) लोकसंख्येची घनता कमी होती.
(1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 15) (नेहमी) खरे बोलावे.
(1) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) यापैकी नाही
प्रश्न 16) श्यामने (पटपट) आंबे गोळा केले.
(1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 17) आई (सतत) काम करते.
(1) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 18) (वारंवार) सूचना देऊन चांगल्या सवयी लागतात.
(1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न 19) (तिथे) आंबे मिळतात.
(1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) यापैकी नाही
प्रश्न 20) राधाने अभ्यास (पूर्ण) केला.
(1) परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय
(2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(3) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(4) यापैकी नाही

वरील प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील टेस्ट सोडवा व view score पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Exit mobile version