बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 2014
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक दोन सहावी ते आठवीसाठी
Mahatet Exam Previous Year Paper 2
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्नपत्रिका
① कारक विकासामध्ये गुटेरिजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?
(A) कारक विकासाच्या संबोधात व्यक्तिभिन्नता दिसून येते. (B) शैशवावस्थेत व बालकावस्थेत कारक क्रियांचा विकास विशिष्ट क्रमाने होतो. (C) कौमार्यावस्था प्राप्त होईपर्यंत मुलामुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. (D) प्राथमिक शाळेतील मुलांचा कारक विकास प्रामुख्याने शारीरिक विकासातील पक्वता आणि सराव यावर अवलंबून असतो.
② शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही?
(A) विकास हा परिमाणात्मक असतो. (B) विकास क्रमबद्ध असतो. (C) प्रत्येक व्यक्तिचा विकासाचा वेग भिन्न असतो. (D) विकासातील बदल सुधारणात्मक असतात.
③ जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस म्हणतात —
(A) मूर्त क्रियाकाल अवस्था (B) शब्दपूर्व अवस्था (C) बौद्धिक विकासाची अवस्था (D) क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ
④ खालीलपैकी कोणते विधान बालोद्यान पध्दती व माँटेसरी पध्दती यामधील फरक दर्शवते?
(A) बालोद्यान पध्दतीत ज्ञानेंद्रिय शिक्षणावर भर दिला जातो. (B) माँटेसरी पध्दतीत 2½ ते 6 वयोगट शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. (C) बालोद्यान पध्दतीत शैक्षणिक साधनांवर भर दिला आहे. (D) माँटेसरी पध्दतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला आहे.
⑤ स्वयंशोधन पध्दतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
(A) ही पध्दती बालमानसशास्त्रीय अध्ययन तत्त्वे पडताळण्यासाठी पूरक आहे. (B) ही पध्दती कार्यकारणभाव शोधण्यासाठी उपयुक्त आहे. (C) या पध्दतीत विद्यार्थीसंख्या मर्यादित हवी. (D) सर्व घटकासाठी ही पध्दत सुयोग्य आहे.
⑥ खालीलपैकी बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक कोणता?
(A) नवीन परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता (B) परिस्थितीनुरूप बदल करण्याचे कौशल्य (C) नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता (D) पुर्वानुभवाची योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता
⑦ गिलफोर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या तीन गटात केले आहे?
(A) बोध, स्मरण, मूल्यमापन (B) क्रिया, आशय, निर्मिती (C) विचार, आशय, बोध (D) स्मरण, निर्मिती, बोध
⑧ मनश्चक्षुवर प्रतिमा निर्मिती होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू नाही?
(A) पूर्वी अनुभव घेतलेला असावा. (B) मिश्र प्रतिमांचा अनुभव येतो. (C) प्रतिमेची तीव्रता वारंवारतेवर अवलंबून असते. (D) एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात.
⑨ मूलभूत तत्त्वांचा आणि परिस्थितींचा आधार सोडता येत नाही, अशा कल्पना म्हणजे —
(A) व्यावहारिक कल्पना (B) सौंदर्यनिष्ठ कल्पना (C) पुनरुत्पादक कल्पना (D) अनिर्बंध कल्पना
⑩ विद्यार्थ्यांच्या विचारशक्तिंचा व तर्कशक्तिंचा विकास होण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे?
(A) आपली मते लादू नयेत (B) मुलांना मते मांडण्याची मुभा द्यावी (C) सर्व मतांचा चिकित्सक विचार करावा (D) मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा
⑪ कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्रावाचे प्रमाण कमी झाल्यास —
(A) उंची वाढते (B) बौद्धिक विकास खुंटतो (C) वजन कमी होते (D) शारीरिक वाढ चांगली होते
⑫ अभ्यासक्रम तयार करतांना टाळावी अशी बाब कोणती?
(A) विद्यार्थ्याची आवड लक्षात घ्यावी (B) कलाशिक्षण, संगीत समाविष्ट करावे (C) अभ्यासक्रम साचेबंद असावा (D) काही विषय ऐच्छिक असावेत
⑬ सचिनचे मूल्यमापन करताना योग्य बाब कोणती?
(A) वर्तनातील बदल (B) अध्यापन पध्दतीची उपयुक्तता (C) उद्दिष्ट साध्यतेचे प्रमाण (D) शैक्षणिक अनुभवांचे संयोजन — (A), (B), (C), (D) सर्व
⑭ मूल्यनिर्धारणाच्या भूमिकेबाबत योग्य विधान —
(A) पुरावा जमा करून अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन (B) निर्णय प्रक्रियेत मूल्यनिर्धारण महत्वाचे (C) गरजा लक्षात घेऊन मूल्यनिर्धारण आवश्यक (D) वरील सर्व
⑮ सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही —
(A) बाह्य परीक्षेला पूरक साधन (B) शिक्षकांना स्वयंरोजगारास मदत (C) व्यक्तिमत्व विकासाची सवय (D) शैक्षणिक निदान
⑯ अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना कोणते तत्त्व वापरावे?
(A) अमूर्तता (B) एकात्म अनुदेशन (C) अधिकची चेतना (D) स्वकृती — (B), (C), (D)
⑰ अध्यायन प्रतिमानांच्या मूलभूत घटकांचा योग्य गट कोणता?
(A) उद्देशबिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली, सहाय्यभूत प्रणाली (B) संरचना, पध्दती, उद्देशबिंदू, सामाजिक प्रणाली (C) उद्देशबिंदू, संरचना, पध्दती, सहाय्यभूत प्रणाली (D) उद्देशबिंदू, पध्दती, आधुनिक अध्यापन
⑱ विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही?
(A) शैक्षणिक कार्यक्रम वेगळा असतो (B) गरजा वेगळ्या असतात (C) वर्तन प्रसामान्य असते (D) शारीरिक वैशिष्ट्ये वेगळी असतात
⑲ शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो?
(A) आदर्शवादी (B) पूर्णाकारवादी (C) समान घटकांची (D) सामान्यीकरणाची
⑳ अध्ययन दोषांचे प्रकार व वर्णन यांपैकी अयोग्य जोड्या कोणत्या?
(A) डिसलेक्सिया – लेखन दोष (B) डिसग्राफिया – वाचन दोष (C) डिसकॅल्क्युलिया – गणिती दोष (D) सर्व
㉑ फ्लँडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीतील अयोग्य विधान —
(A) शिक्षकांच्या शाब्दिक वर्तनाचे निरीक्षण करते (B) 1-7 गट शिक्षकांसाठी आहेत (C) 8-9 गट विद्यार्थ्यांसाठी आहेत (D) 10 वा गट मुख्याध्यापकांसाठी आहे
㉒ मंद विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय टाळावे?
(A) त्यांना वेगळे न करता शिकवावे (B) मुद्दे घटवून घ्यावेत (C) झेपतील असे गृहपाठ द्यावेत (D) आत्मविश्वास वाढवावा
㉓ शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा ठसा विद्यार्थ्यावर उमटतो ही कोणती उपपत्ती सूचित करते?
(A) सर्वसामान्य अध्ययन उपपत्ती (B) वर्णनात्मक अध्ययन उपपत्ती (C) औपचारिक अध्ययन उपपत्ती (D) पारस्पारिक पृच्छा उपपत्ती
㉔ अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात कोणती बाब दिसून येत नाही?
(A) भाषेत मागे असतात (B) ऐकलेले शब्द तशीच्या तशी म्हणता येतात (C) प्रसंग वर्णन करता येत नाही (D) वाक्यरचना समजण्यात मागे पडतात
㉕ सहवासविषयक गरज कोणती?
(A) ऐंद्रिय समाधान (B) सत्ता (C) समाजमान्यता (D) स्थैर्य
㉖ अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता?
(A) तात्कालिक गरज (B) आवर्तने (C) सवय (D) वृत्ती
㉗ प्रेरणेचे कोणते वैशिष्ट्य नाही?
(A) वर्तनाला दिशा देते (B) वर्तन पूर्ण होईपर्यंत कार्यरत असते (C) प्रेरणेमुळे निवड होते (D) प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो
㉘ संवेदना निर्माण होण्यासाठी कोणत्या बाबींची गरज असते?
(A) उद्दिपक (B) ज्ञानेंद्रिय (C) मज्जासंस्था (D) सर्व
㉙ रंगांचे स्मरण सूत्र “ता, ना, पि, ही, नि, पा, जा” हे कोणत्या पद्धतीवर आधारित आहे?
(A) समध्यंतर पद्धत (B) स्मृतीसहायक पध्दत (C) समग्र पध्दत (D) उच्चारण पध्दत
㉚ चित्तभ्रमातील अयोग्य बाब कोणती?
(A) उद्दिपक नसताना भास होतात (B) मनाच्या विशिष्ट अवस्थेमुळे होतात (C) संवेदनांचा चुकीचा अर्थ लावला जातो (D) मनाची अतिसंवेदनशील अवस्था कारण नाही
उत्तर पत्रिका
1)कौमार्यावस्था प्राप्त होईपर्यंत मुलामुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो.
2)विकास हा परिमाणात्मक असतो
3)शब्दपूर्व अवस्था
4)माँटेसरी पध्दतीत वैयक्तिक शिक्षण व कृतीवर भर दिला आहे.
5) सर्व घटकासाठी ही पध्दत सुयोग्य आहे.
6)नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता
7)क्रिया, आशय, निर्मिती
8)एखाद्याच्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात.
9)व्यावहारिक कल्पना
10) मनावर भावना व पूर्वग्रहाचा पगडा ठेवून विचार करावा.
11)बौद्धिक विकास खुंटतो
12)अभ्यासक्रम साचेबंद असावा.
13)),( अ )(ब), (क), (ड) सर्व
14)वरील सर्व
15)शिक्षकांना स्वयंरोजगारास मदत करणे.
16)ब), (क) आणि (ड)
17)उद्देशबिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली, सहाय्यभूत प्रणाली
18) या मुलांचे वर्तन प्रसामान्य असते.
19)समान घटकांची उपपत्ती
20)अ) आणि (ब)
21)या प्रणालीत दहावा गट मुख्याध्यापकाच्या वर्तनाशी संबंधित आहे.
22)या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यापासून वेगळे न करता अध्यापन करावे.
23)औपचारिक अध्ययन उपपत्ती
24)ऐकलेले शब्द किंवा वाक्ये जशीच्या तशी म्हणता येतात
25)समाजमान्यता
26) आवर्तने
27)प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल साधला जातो.
28) (अ), (ब), (क), सर्व
29)स्मृतीसहायक पध्दत
30)चित्तभ्रमात संवेदनांचा चुकीचा अर्थ लावला जातो.