मराठी व्याकरण सराव प्रश्नपत्रिका
(MahaTET, Scholarship Exam, इयत्ता ५ वी ते १० वी व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त)
सूचना :
प्रत्येक प्रश्नाला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
सर्व प्रश्न समान गुणांचे आहेत.
प्रश्न :
1)नदी, डोंगर, प्राणी, पक्षी या शब्द गटातील शब्द ओळखा.
A) हिमालय
B) सह्याद्री
C) अरवली
D) समुद्र
2)श्रीमंती, गरिबी, सुंदरता, चातुर्य या शब्द गटासाठी योग्य शब्द ओळखा.
A) छान
B) गोड
C) माधुर्य
D) कुरूप
3)जेव्हा दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतात तेव्हा कोणते विरामचिन्ह वापरतात?
A) पूर्णविराम
B) स्वल्पविराम
C) अपूर्णविराम
D) अर्धविराम
4) कंसातील विरामचिन्ह ओळखा ( ; )
A) पूर्णविराम
B) अर्धविराम
C) स्वल्पविराम
D) अपूर्णविराम
5)”ययाति” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A) वि. स. खांडेकर
B) लोकमान्य टिळक
C) चि. वि. जोशी
D) प्र. के. अत्रे
6)’मराठी भाषेचे शिवाजी’ कोणाला म्हणतात?
A) विनोबा भावे
B) पु. ल. देशपांडे
C) दादोबा पांडुरंग तर्खडकर
D) राम गणेश गडकरी
7)पुढीलपैकी सकर्मक क्रियापद असणारे वाक्य निवडा.
A) सुधा बाजारात जाते.
B) सचिन क्रिकेट खेळतो.
C) माकड झाडावर चढले.
D) आजी लवकर उठते.
8)पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद आहे?
A) श्रीकांत बाळाबरोबर खेळतो.
B) बाबांना आता छोटी टेकडी चढवते.
C) मुले अभ्यासाला बसली.
D) यापैकी नाही
9)”पोहणे त्याला खूप आवडते.” (पोहणे हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?)
A) भाववाचक नाम
B) धातुसाधित नाम
C) सामान्य नाम
D) विशेष नाम
10)ज्या नामाने प्राणी वस्तू त्यांच्यामध्ये असलेल्या गुण, भाव यांचा बोध होतो त्याला काय म्हणतात?
A) विशेष नाम
B) सामान्य नाम
C) भाववाचक नाम
D) वरीलपैकी नाही
11)शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. (साठ वर्षांनी साजरा होणारा उत्सव)
A) हीरक महोत्सव
B) रौप्य महोत्सव
C) सुवर्ण महोत्सव
D) अमृत महोत्सव
12)पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी समानार्थी नाही?
A) नौबत – डंका
B) अगम्य – गंभीर
C) सोशीक – पीडित
D) कवाड – द्वार
13)’गोविंदाग्रज’ हे टोपणनाव कोणाचे?
A) वि. वा. शिरवाडकर
B) प्र. के. अत्रे
C) रा. ग. गडकरी
D) कृ. के. दामले
14)अपूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य निवडा.
A) मी सहजपणे लंगडी खेळत असते
B) मी सहजपणे लंगडी खेळत असे
C) मी सहजपणे लंगडी खेळत आहे
D) मी सहजपणे लंगडी खेळते
15)पुढील वाक्याचा प्रकार ओळखा : ‘रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते.’
A) मिश्र
B) उद्गारार्थी
C) केवल
D) संयुक्त
16)’मंत्रालय’ या शब्दाचा विग्रह सांगा.
A) मंत्र + आलय
B) मंत्रा + आलय
C) मंत्री + लय
D) मंत्री + आलय
17)(हसणे) हा मनुष्यस्वभाव आहे. [कंसातील शब्दाचा प्रकार ओळखा.]
A) भाववाचक नाम
B) क्रियावाचक नाम
C) विशेष नाम
D) क्रियापद
18)तेंडुलकरने शतक ठोकले. (या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.)
A) तृतीया
B) प्रथमा
C) चतुर्थी
D) षष्ठी
19)’संगर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A) समुद्र
B) सागर
C) युद्ध
D) नदी
20)वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत?
A) उभयान्वयी अव्यय
B) शब्दयोगी अव्यये
C) केवलप्रयोगी अव्यय
D) गुणविशेषण
21)पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? “किती मोठा हा साप”
A) !
B) .
C) ?
D) :
22)शब्दयोगी अव्यय असणारे वाक्य ओळखा.
A) शिक्षिकेने कडू टेबलावर ठेवला.
B) पतंग खाली पडला.
C) पुढे मोठे जंगल आहे.
D) राधाने भात तयार केला.
23)”अंगापेक्षा बोंगा मोठा” या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?
A) मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टीचा बडेजाव मोठा असणे.
B) ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
C) मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही.
D) प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.
24)वर्णानुक्रमे शब्द लावल्यास कोणता शब्द शेवटून पहिला येईल?
A) त्वचा
B) नाक
C) जीभ
D) डोळा
25)खालील पर्यायातील अशुद्ध शब्द ओळखा.
A) त्रिभुवन
B) दीपक
C) दिपक
D) नीती
Marathi Grammar Practice Paper for Scholarship and Competitive Exams
