National and State Commissions for Protection of Child Rights | Competitive Exams

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग व राज्य बालहक्क संरक्षण आयोग

केंद्र प्रमुख टेस्ट सिरीज
विषय: राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग व राज्य बालहक्क संरक्षण आयोग
१. बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आयोग आणि राज्य आयोग यांची स्थापना करण्यासाठी बालकांच्या हक्काचे संरक्षण आयोग अधिनियम, ——— पारित करण्यात आला आहे.
① 2010 ② 2001 ③ 2000 ④ 2005
२. बालकांच्या हक्क कायद्यानुसार किती वर्षाखालील व्यक्तीला बालक असे म्हटले आहे?
① 10 ② 21 ③ 14 ④ 18
३. बाल हक्क संरक्षण कायदा 2005 अन्वये महाराष्ट्र राज्यात 2007 मध्ये राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली.
① हे विधान बरोबर आहे. ② हे विधान चूक आहे.
४. राज्य बाल हक्क आयोगासंदर्भात चुकीचे विधान निवडा.
① आयोगाचे अध्यक्ष हे बाल कल्याणाच्या क्षेत्रात कार्य करणारे विख्यात व्यक्ती असतात. ② राज्य सरकारद्वारे या आयोगात सहा सदस्यांची नेमणूक केली जाते. ③ त्यातील कमीत कमी दोन महिला सदस्य असतात. ④ अध्यक्ष व सदस्य यांचा पदग्रहण केल्यापासूनचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो.
५. योग्य विधान निवडा.
① बाल हक्क कायदा 2005 अंतर्गत कलम 14 व 24 नुसार 14 वर्षाखाली असलेल्या मुलांना सक्तीने शिक्षण देण्याची तरतूद करणे. ② बालहक्क विषयक तक्रारीची जाहीर सुनावणी घेऊन शिफारसी करणे. ③ बाल हक्काची पायमल्ली करणाऱ्या व्यक्ती किंवा यंत्रणाविरुद्ध कारवाईची शिफारस करणे. ④ वरील सर्व
६. बाल हक्क संरक्षण आयोगाला दिलेल्या अधिकारानुसार आयोगाने मुलांसाठी महत्त्वाची मानके ठरवून दिली आहेत. (योग्य विधान निवडा.)
① बालकांना सर्व प्रकारच्या जातीपाती, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मते, राष्ट्रीय पंरपरा किंवा सामाजिक मुळ, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा याच्या भेदभावा पासून संरक्षण आहे. ② बालकांसंदर्भातील कृतीमध्ये, बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल. ③ बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे. ④ वरील सर्व
७. बालहक्क संरक्षण संदर्भात राज्य शासनाचे संकेतस्थळ कोणते आहे?
① https://womenchild.maharashtra.gov.in/ ② https://child.maharashtra.gov.in/ ③ https://women.maharashtra.gov.in/ ④ वरील सर्व ⑤ यापैकी नाही
८. NHRC म्हणजे काय?
① National Human Rights Commission ② National Human Research Committee ③ National Human Rights Committee ④ None of these
९. भारत देशात मानवी हक्क आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी करण्यात आली.
① हे विधान बरोबर आहे. ② हे विधान चूक आहे.
१०. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल किती असतो?
① पद धारण केल्यापासून सहा वर्षांचा किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत जे अगोदर घडेल ते ② पद धारण केल्यापासून पाच वर्षांचा किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत जे अगोदर घडेल ते ③ पद धारण केल्यापासून सहा वर्षांचा किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत जे अगोदर घडेल ते ④ पद धारण केल्यापासून पाच वर्षांचा किंवा वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत जे अगोदर घडेल ते
११. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक कोण करतो?
① पंतप्रधान ② राष्ट्रपती ③ सरन्यायाधीश ④ लोकसभा सभापती
१२. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर मानवी हक्क चळवळीला महत्त्व प्राप्त झाले. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक समितीने ———- यावर्षी संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क आयोगाची स्थापना केली.
① 1951 ② 1946 ③ 1960 ④ 1940
१३. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा संमत व स्वीकृत केला आहे.
① हे विधान बरोबर आहे. ② हे विधान चूक आहे.
१४. आयोगाला खालील सर्व सिव्हील कोर्टाचे आणि खासकरून खालील मुद्द्यांवर आधारित हक्क आहे. चुकीचे विधान निवडा.
① भारताच्या कोणत्याही भागातील कोणत्याही व्यक्तिवर शपथ लादणे आणि ती लागू करणे. ② कोणत्याही दस्ताऐवजांचा शोध व त्याचे उत्पादन. ③ कायदेशीर बाबी व साक्षींची मागणी करणे. ④ आयोगाच्या दस्ताऐवजांच्या पाहणीसाठी कोणती कृती करू नये.
१५. A) शिक्षण विभागाने नेमलेल्या बाल संरक्षकाच्या मदतीने बाल हक्काची मोहीम तळागाळापर्यंत नेण्यात येते.
B) राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे आहेत.
① फक्त विधान A बरोबर आहे. ② दोन्ही विधाने बरोबर आहेत. ③ दोन्ही विधाने चूक आहेत. ④ फक्त विधान B बरोबर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Exit mobile version