शिक्षक पात्रता परीक्षा व केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट सिरीज
विषय: शैक्षणिक तत्त्वज्ञान व भारतीय शिक्षणतज्ञ
१. भारतीय स्त्री शिक्षणाचे आद्य जनक म्हणून कोण ओळखले जातात?
(१) सावित्रीबाई फुले
(२) महर्षी धोंडो केशव कर्वे
(३) महात्मा ज्योतिबा फुले
(४) यापैकी नाही
२. पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी सुरू केली?
(१) १८४८
(२) १८४९
(३) १८५०
(४) १८५५
३. महात्मा फुले यांनी १८८२ मध्ये कोणत्या आयोगासमोर शिक्षण सक्तीचे व मोफत असावे अशी मागणी केली?
(१) सायमन आयोग
(२) हंटर आयोग
(३) मेयो आयोग
(४) यापैकी नाही
४. महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व कोणत्या ग्रंथात सांगितले आहे?
(१) ब्राह्मणांचे कसब
(२) गुलामगिरी
(३) शेतकऱ्याचा आसूड
(४) यापैकी नाही
५. सावित्रीबाई फुले यांनी १८४६ मध्ये पुण्यातील कोणत्या स्कूलमध्ये प्रवेश घेतला?
(१) मॉडेल स्कूल
(२) नॉर्मल स्कूल
(३) इंडिपेंडन्स स्कूल
(४) यापैकी नाही
६. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी कुठे झाला?
(१) पुणे
(२) फुलेनगर
(३) नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा
(४) यापैकी नाही
७. “निसर्गाच्या सहवासात शिक्षण” ही संकल्पना कोणत्या तत्त्वज्ञाची होती?
(१) स्वामी विवेकानंद
(२) महात्मा गांधी
(३) रवींद्रनाथ टागोर
(४) यापैकी नाही
८. रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनची स्थापना कोणत्या वर्षी केली?
(१) १८९३
(२) १९०१
(३) १९५५
(४) १९१२
९. रवींद्रनाथ टागोर यांचे खालील कार्य योग्य कोणते आहे?
(१) १९०१ – शिक्षा सत्र शाळा
(२) १९२१ – विश्वभारती विद्यापीठ
(३) १९२२ – श्री निकेतन संस्था
(४) १९२४ – शिक्षा सत्र शाळा
👉 (२) योग्य आहे
१०. स्वामी विवेकानंद यांच्या मते शिक्षण म्हणजे काय?
(१) मनुष्यातील विद्यमान पूर्णत्वाचे प्रकटीकरण
(२) आत्म्याचे दमन
(३) मनाची परीक्षा
(४) समाजसेवा
११. ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या ठिकाणी व्याख्यान दिले?
(१) शिकागो
(२) पॅरिस
(३) लंडन
(४) यापैकी नाही
१२. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा केली?
(१) १ मे १८९७
(२) १ मे १८९६
(३) १९०१
(४) १९०४
१३. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे?
(१) १९०४ – फिनिक्स आश्रम
(२) १९११ – टॉलस्टॉय आश्रम
(३) १९२१ – गुजरात विद्यापीठ
(४) १९३७ – गुजरात विद्यापीठ
👉 चुकीचा पर्याय (४) आहे
१४. महात्मा गांधींनी १९३७ मध्ये कुठे मूलोद्योगी शिक्षण मांडले?
(१) मुंबई
(२) अहमदाबाद
(३) नागपूर
(४) वर्धा
१५. योगी अरविंद घोष यांनी १९१० मध्ये कोणत्या ठिकाणी आश्रम स्थापन केला?
(१) उत्तर प्रदेश
(२) पुदुच्चेरी
(३) मध्य प्रदेश
(४) नागालँड
१६. राजर्षी शाहू महाराजांनी २५ जुलै १९१७ रोजी कुठे शिक्षण मोफत व सक्तीचे केले?
(१) सातारा
(२) कोल्हापूर
(३) पुणे
(४) यापैकी नाही
१७. भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून कोण ओळखले जातात?
(१) महात्मा फुले
(२) महात्मा गांधी
(३) राजर्षी शाहू महाराज
(४) यापैकी नाही
१८. “व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग” हे वसतिगृह कोणी सुरू केले?
(१) महात्मा फुले
(२) डॉ. आंबेडकर
(३) राजर्षी शाहू महाराज
(४) महात्मा गांधी
१९. राजर्षी शाहू महाराजांनी संस्कृत शाळा कधी सुरू केली?
(१) २९ जुलै १९१७
(२) १५ मे १९१८
(३) २६ जून १९१७
(४) यापैकी नाही
२०. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केव्हा केली?
(१) २० जुलै १९२४
(२) १८ जुलै १९४६
(३) १५ मार्च १९४५
(४) यापैकी नाही
२१. डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
(१) १९९५
(२) १९५२
(३) १९५६
(४) १९९०
२२. आंबेडकरांनी १९२० मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले?
(१) दीनबंधू
(२) बहिष्कृत भारत
(३) मूकनायक
(४) यापैकी नाही
२३. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
(१) बहुजन समाजात शिक्षण प्रसार
(२) अस्पृश्यता नष्ट करणे
(३) वसतिगृह स्थापन करणे
(४) वरील सर्व
२४. “He was a king but a democratic king” हे विधान कोणी म्हटले?
(१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(२) भाई माधवराव बागल
(३) लोकमान्य टिळक
(४) भाऊ दाजी लाड
२५. २ ऑक्टोबर हा दिवस भारतात महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. जगभर तो कोणत्या दिवस म्हणून साजरा होतो?
(१) जागतिक पर्यटन दिन
(२) आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
(३) जागतिक मानवाधिकार दिन
(४) यापैकी नाही
